मोठा निर्णय: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता

राज्यात मुख्यमंत्री  ग्राम सडक  योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ (Chief Minister) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार राज्यातील 10 हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्ते बांधणीचे कामे करण्यात येणार आहेत. राज्याच्या 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण सडक विकास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी 40 हजार कि.मी.लांबीचे रस्त्यांचे काम हाती घेवून … Read more

राज्यात यावर्षी १० हजार किमी लांबीचे रस्ते बांधणार – हसन मुश्रीफ

मुंबई – राज्यातील ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय  दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याने ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या मंत्रिमंडळ … Read more

रस्ते विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – एकनाथ शिंदे

औरंगाबाद – रस्ते चांगले तरच शहराचा विकास  शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक दर्जेदार रस्ते करण्यासाठी प्रयत्न करावेत, या भागातील रस्ते विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हर्सूल येथील भगतसिंग नगर येथे विविध वॉर्डामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या विकासकामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार अंबादास … Read more

प्राधान्यक्रम ठरवून येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा – छगन भुजबळ

नाशिक – येवला शहरातील रस्ते, गटार, वीज यासह स्वच्छतेची कामे मार्गी लावण्यात यावी. तसेच अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येवला संपर्क कार्यालय येथे येवला शहरातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामाची … Read more

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविणार; राज्यात २ लाख किलोमीटर्सचे रस्ते बांधणार

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात … Read more

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर भर – दादाजी भुसे

मालेगाव – शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतातील उत्पन्न बाजारात पोहचविणे व शेतीसाठी लागणारे दैनंदिन साहित्य शेतीपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्यातील रस्त्यांचे कॉक्रीटिकरणाचे काम होणे गरजेचे असून यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मीतीवर विशेष लक्ष केंद्रीत करुन, या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी … Read more

प्रलंबित रस्ते प्रकल्पांना कालबद्ध रितीने मार्गी लावा – उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई – राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून  नियमित आढावा घेण्यात येणार आहे.  भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांना दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … Read more