महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२२ ची ८.६६ टक्के दराने परतफेड

मुंबई – महाराष्ट्र Maharashtra शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.66 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 25 जानेवारीं 2022 रोजी पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-10,11/प्र.क्र.2/अर्थोपाय दि.20 जानेवारी 2022 अनुसार 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि.24 जानेवारी 2022 पर्यंत देय … Read more

महसूल विभागांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना सुविधा द्याव्यात!

औरंगाबाद – महसूल (Revenue) विभागाच्या कामकाजात ‘ई ’ फेरफार सातबारा, शासकीय जमिनीचे अभिलेखे व नोंदीमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन पारदर्शकपणे नागरिकांना महसूल (Revenue) विभागाने सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल (Revenue) विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपायुक्त … Read more

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी

नागपूर – ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील 6 हजार 123 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देणाऱ्या या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे … Read more

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे सुनील केदार यांचे आवाहन

मुंबई – राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील … Read more

महाआवास अभियानांतर्गत विभागात ९० हजार घरकुलांचे बांधकाम

नागपूर – विभागातील घरकुल नसलेल्या कुटुंबांना महाआवास अभियानांतर्गत  प्रधानमंत्री आवास  तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 90 हजार घरकुले उपलब्ध करुन देण्यात येत असून येत्या वर्षभरात घरकुलाच्या बांधकामाचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महा आवास अभियान-2 उपक्रमाचे नियोजन तसेच घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठीच्या विभागीय … Read more

महिला व बालविकास विभागातील रिक्त पदे सुधारित सेवा प्रवेश नियमांनी भरणार

मुंबई – महिला व बालविकास विभागांतर्गत गट – अ व गट – ब संवर्गातील रिक्त पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियमाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून त्यानंतर ही रिक्त पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवण्यात येईल, असे महिला व बालविकास विभागाने  कळविले आहे. सद्यस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट – अ व गट – ब … Read more

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ योजना राबविण्यास मंजुरी – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत तीन तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पाच योजना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रुग्णालयांच्या इमारतीचे बांधकाम विस्तारीकरण, दुरुस्ती देखभाल, इमारतीचे, विद्युत जोडणीचे लेखापरिक्षण, रुग्णवाहिकांची खरेदी करता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती … Read more

राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता

मुंबई – राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या तत्सम योजनांना जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण) म्हणून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. याबाबतचे शासन निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार निर्गमित झाले आहेत. … Read more

राज्यातील ‘या’ विभागात डिजिटल सात–बारा वाटप मोहिमेस गती

ठाणे जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 24 हजार 491 खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहिम सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 लाख 45 हजार 171 इतके सातबारे असून त्यापैकी 5 लाख 4 हजार 91 शेतीचे सातबारा आहेत. यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख सात-बारा उताऱ्याचे वाटप जिल्ह्यात झाले … Read more

ग्रामविकास विभागाकडून ५० लाखांचा निधी देणार – हसन मुश्रीफ

कोल्हापूर – कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उभारणीसाठी ग्रामविकास विभागाकडून 50 लाख रूपयांचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कळंबे तर्फ ठाणे येथील ग्रामपंचायतीच्या नवीन प्रस्तावित इमारतीचे भूमीपूजन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते . व्यासपीठावर खा. संजय मंडलिक, आ. … Read more