उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न – बाळासाहेब थोरात

पुणे – उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करण्यासोबतच उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. येरवडा येथे मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्यावतीने कोरोना कालावधीत तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या  मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त … Read more

राज्यातील दीड लाख कामगारांच्या पगारात १२ टक्के वाढ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार … Read more

चांगली बातमी – प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार

नाशिक – केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये समाविष्ट असलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत इच्छुक व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना उद्योग उभारणी, इन्क्युबेशन सेंटर, पायाभूत सुविधा, ब्रँडिंग व विपणन, क्षमता बांधणी व संशोधनासाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के किंवा कमाल १० लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करावा, असे … Read more

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार – दत्तात्रय भरणे

मुंबई – चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीसाठी उत्तेजन देण्याबाबत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य … Read more

कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करणार – दादाजी भुसे

मुंबई – शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगवाढीस चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ची संकल्पना राबवणे, मूल्यसाखळी विकसित करणे, कृषी मालाला भाव मिळण्यासाठी विपणन आराखडा तयार करणे आदी बाबींना … Read more

शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी उद्योग वाढीस मिळणार चालना – दादाजी भुसे

मुंबई – शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगवाढीस चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात महाराष्ट्राचा ब्रॅण्ड तयार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ची संकल्पना राबवणे, मूल्यसाखळी विकसित करणे, कृषी मालाला भाव मिळण्यासाठी विपणन आराखडा तयार करणे आदी बाबींना … Read more