शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषिपंपाची थकबाकी भरावी

औरंगाबाद – औरंगाबाद परिमंडलात कृषिपंप (Agricultural pump) वीजबिल वसुलीस प्रतिसाद मिळत आहे. ज्या गावात वसुली, त्याच गावात काम असा निकष ठेवल्याने अनेक गावे वसुलीसाठी पुढे येत आहेत. कृषी वीज धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शेतीच्या बांधावर, गावच्या पारावर मेळावे घेतले जात आहेत. धोरण पोहोचले असले तरी ‘बिल आज भरू, उद्या भरू’ असे म्हणत महावितरणच्या कृषी वीज धोरणात … Read more

अबब ! शेतकरी कृषिपंपांचे एवढे अर्ज ‘वेटींग’वर

गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी हवा तसा पाऊस नसल्याकारणाने शेतीवर त्याचा परिणाम होत आहे. पाऊसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एका पावसासाठी हाती आलेले पीक हे निसटण्याचे चित्र बघायला मिळत आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर सिंचनाची मदत घेऊन शेती वाचविण्याची पाळी  येते. पण सिंचनाची मदत म्हणजे त्यासाठी कृषी पंपाची गरज पडते. आता यासाठी शेतकरी पाण्याची … Read more

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; कृषिपंपांच्या पाच हजार जोडण्या अडकल्या

यवतमाळ – दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. सिंचन करता यावे म्हणून शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर सिंचन विहिरींवर असून धडक सिंचन योजनेच्या विहिरीसोबत शेतकऱ्यांनी स्वत: कर्ज काढून विहिरीचे काम पूर्ण केले. एवढे केल्यावर आपल्याला सिंचन करता येईल असा विश्वास शेतकऱ्यांना होता पण तसे नसून सिंचन विहिरी पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. … Read more

कॅपॅसिटर कृषी पंपाचा तारक, तर ऑटो स्विच मारक

वेब टीम- वीज आज माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाटयाने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठी विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक संसाधनाचा वापर करून उद्योग अथवा शेती करणे ओघाने कमी होत गेले. विजेचा वापर प्रत्येक जीवनावश्‌यक गोष्टीमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच वीज यंत्रणेवर … Read more