लोकांच्या जीवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – वाढत्या औद्योगिक प्रदुषणामुळे चंद्रपूर आणि आजुबाजुच्या परिसरातील झाडे काळसर पडली आहेत. जगाच्या पाठीवर कदाचित हे एकमेव उदाहरण असेल जेथे झाडांचा रंग हिरव्यासोबतच काळा बघायला मिळतो. तसेच प्रदुषणाच्या समस्येची तिव्रता लक्षात येण्यासाठी शहरात लावण्यात आलेले कृत्रिम हृदयसुध्दा चार-पाच दिवसातच काळे होते. यावरून चंद्रपूरची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कंपन्या … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार – विजय वड़ेट्टीवार

चंद्रपूर – सावली तालुका आणि परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरात धानासाठी बारमाही पाणी उपलब्ध आहे. मात्र, वरचा अवकाळी पाऊस आपल्या हाती नाही. काही दिवसांपूर्वी या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

ब्रम्हपुरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून विकास कामांची गती काही प्रमाणात संथ झाली होती. आता मात्र, राज्यशासन कोरोनाच्या संकटावर मात करून विकासाकडे अग्रेसर झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा येथे … Read more

२०२१-२२ ची अर्थसंकल्पीय तरतूद वेळेत खर्च करा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – सन 2021-22 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 454 कोटी 34 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण योजनेकरिता 300 कोटी, आदिवासी योजनेंतर्गत 82.34 कोटी तर अनुसूचित प्रवर्गाच्या योजनांकरीता 72 कोटींचा समावेश आहे. सदर पूर्ण रक्कम जिल्ह्याच्या विकासासाठी असून कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या विभागाची रक्कम वेळेत खर्च करावी, असे निर्देश राज्याचे मदत व … Read more

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकीत वेतन द्यावे – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी  करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले. … Read more

धान्याची उचल न करणाऱ्या शिधापत्रिका धारकांची माहिती घ्या – छगन भुजबळ

चंद्रपूर – गरजूंना दोन वेळच्या अन्नाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु काही शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करत नसल्यामुळे धान्याचा साठा पडून राहतो. परिणामी धान्य वाया जाते. कार्डधारक धान्याची उचल का करत नाही, तसेच कधीपासून संबंधित लाभार्थ्याने धान्याची उचल केली नाही, याबाबत माहिती घ्यावी. शहरी भागात ५९ … Read more

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युर‍िया उपलब्ध – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतमालाची परिस्थितीसुध्दा अतिशय चांगली आहे. शेतीकरीता आवश्यक असलेला युरिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणात असून खरीप आणि रब्बी मध्ये युरियाचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यात रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. … Read more