परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कोरोना विषाणूचा नवा व्हेरीएंट ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यामध्ये परराज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅकिंग व टेस्टिंग करा व लसीकरणाचा वेग वाढवा.असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीज कलमी सभागृहात ओमिक्रॉन संदर्भाने करावयाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार – विजय वड़ेट्टीवार

चंद्रपूर – सावली तालुका आणि परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरात धानासाठी बारमाही पाणी उपलब्ध आहे. मात्र, वरचा अवकाळी पाऊस आपल्या हाती नाही. काही दिवसांपूर्वी या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

भाविकांसाठी धार्मिक पर्यटन क्षेत्राचा विकास करणार – विजय वड़ेट्टीवार

चंद्रपूर – धार्मिक तिर्थस्थळे ही माणसांना जोडणारी ठिकाणे असून विविध जातीधर्माचे नागरीक दर्शनाला एकत्र येत असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये एकोपा निर्माण होण्यास मदत होते. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथील अंबिका माता व एल्लमा मातेचे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. येथे सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना मनापासून आनंद होत आहे. भाविकांसाठी अशा धार्मिक पर्यटन क्षेत्राचा विकास करून नागरिकांना येथे … Read more

ब्रम्हपुरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून विकास कामांची गती काही प्रमाणात संथ झाली होती. आता मात्र, राज्यशासन कोरोनाच्या संकटावर मात करून विकासाकडे अग्रेसर झाले आहे. या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा येथे … Read more

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य – विजय वडेट्टीवार

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने  दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार )  इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य शासनाने  मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना  तयार   केली आहे. … Read more

इमाव विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना होणार सुरू – विजय वडेट्टीवार

मुंबई – इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ‘शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना’  सुरू होणार आहे.  दरवर्षी ४०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेणार असून या योजनेसाठी दरवर्षी ६ कोटी रूपयांची … Read more

२०२१-२२ ची अर्थसंकल्पीय तरतूद वेळेत खर्च करा – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – सन 2021-22 या वर्षात चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 454 कोटी 34 लक्ष रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यात सर्वसाधारण योजनेकरिता 300 कोटी, आदिवासी योजनेंतर्गत 82.34 कोटी तर अनुसूचित प्रवर्गाच्या योजनांकरीता 72 कोटींचा समावेश आहे. सदर पूर्ण रक्कम जिल्ह्याच्या विकासासाठी असून कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या विभागाची रक्कम वेळेत खर्च करावी, असे निर्देश राज्याचे मदत व … Read more

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू – विजय वड़ेट्टीवार

चंद्रपुर – गत आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. वरच्या पावसामुळे हातात आलेले पीक गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिला. सावली … Read more