अवकाळी पावसाचा तब्बल 7 हजार 431 हेक्टर फटका; पिकांसह भाजीपालाचे मोठे नुकसान

नागपूर  – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Untimely) पाऊस  पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर  बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी , गुमथी, लोणखैरी, सावनेर , दहेगाव(रं), पारशिवणी ,  इटगांव, भागीमहारी, रामटेक , जमुनीया, टुयापार, घोटी, फुलझरी या भागात अवकाळी (Untimely) पावसाचा मोठा फटका बसला आहे.  या … Read more

‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित

मुंबई – ‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील ‘महिला बचतगट’ आणि ‘अनुसूचित जाती जमाती’चे सक्षमीकरण करण्यासाठी ‘रोजगार निर्मिती’वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी आज वितरीत करण्यात आला असून ही विशेष योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या ‘विशेष योजने’बाबतची … Read more

राज्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ; वाटाणा प्रति किलो १०० रुपये

नवी दिल्ली – इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला, वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. टोमॅटोच्या दरासह वाटाण्याचे … Read more

कशी करावी कांदा लागवड? जाणून घ्या एका क्लिकवर

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा … Read more

वांगी लागवड तंत्रज्ञान, माहित करून घ्या

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्‍ट्रात … Read more

परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गाजराची ४०० क्विंटल आवक होती. गाजराला प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना, प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला … Read more