योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून कोविडबाधित परिवारापर्यंत लाभ पोहोचवावे – नीलम गोऱ्हे

मुंबई – कोविडच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांनी समन्वय साधून कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी व कोविडमुळे बाधित परिवारापर्यंत लाभ पोहचवावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिल्या. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे, नाशिक, धुळे, जालना, जळगाव, पालघर जिल्ह्यात दौरे केले होते. त्यावेळी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी … Read more

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

मुंबई – दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या विषाणूंना ‘चिंतेची बाब’ (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. यासंदर्भात नवीन निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत – अ -भारत सरकारने वेळोवेळी … Read more

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध

पुणे : उद्यापासून सुरु होणाऱ्या  पुण्यातील चित्रपट आणि नाट्य गृहात प्रेक्षकांच्या संख्येवर निर्बंध नसतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पुन्हा निर्बंध घालावे लागत आहेत. मायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे. पुण्यातील खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी 25 … Read more

वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे – आदित्य ठाकरे

मुंबई – पर्यावरण संवर्धन ही एखादा दिवस म्हणून साजरा करण्याची बाब राहिली नसून लहान लहान पर्यावरणपूरक बाबींची सवय लागणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. राज्यातील शहरे कार्बन न्यूट्रल व नेट झिरो होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे शून्य कार्बन उत्सर्जन परिषदेचे आयोजन करण्यात आले … Read more