कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज

सोलापूर – जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी शासन व प्रशासकीय स्तरावरील नकारात्मक बाबी समोर आणाव्यात. परंतु सोलापूर जिल्ह्याची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा कशा पद्धतीने तयार होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. येथील फडकुले … Read more

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम – मुख्यमंत्री

मुंबई – कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित … Read more

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव – जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी … Read more

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ

नाशिक –  जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत  असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, … Read more