सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून तालुक्यातील शाळांचा विकास साधणार – दादाजी भुसे

मालेगाव – असंख्य चिमुकल्यांच्या डोळ्यात असलेल्या भविष्याचा दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा सामाजिक दायित्व निधीतून विकास साधतांना विलक्षण आनंद होत असून तालुक्यातील सर्व शाळांचा या माध्यमातून विकास साधण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सिंजेंटा इंडीया लि. या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून साकारण्यात आलेल्या … Read more

अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आहाराकरिता मिळणार रोख रक्कम – नवाब मलिक

मुंबई – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या व उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच … Read more

आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी; एक कोटीची भरघोस वाढ

मुंबई – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. हा शब्द अजित पवार यांनी पाळला असून आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे, त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास … Read more

विकासासाठी जमिनी देणाऱ्या बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन वेळेत व्हावे – दादा भुसे

मुंबई – पालघर जिल्ह्यातून सध्या मुंबई-वडोदरा तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध विकास कामे सुरु आहेत. या विकासकामांसाठी ज्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्या बाधित शेतकऱ्यांचे वेळेत पुनर्वसन व्हावे आणि त्यांना त्याचा वेळेत मोबदला मिळावा, अशा सूचना कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. डहाणू तालुक्यातील चंद्रनगर गावातील नागरिकांना … Read more

मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला – अनिल परब

मुंबई – परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला मानव विकास कार्यक्रमातंर्गत दुसऱ्या टप्प्यातील २३१ कोटी ३० लाख रूपयांचा निधी मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर, २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.  राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या ९३ हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनाचा प्रश्न सुटणार असून, लवकरच त्यांना सप्टेबर … Read more

विकास सर्वसमावेशक व चौफेर असावा – उद्धव ठाकरे

ठाणे – सुदृढ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चौरस आहार आवश्यक असतो, त्याप्रमाणेच विकाससुद्धा चौफेर आणि सर्वसमावेशक असावा, भविष्यातील गरजा ओळखून विकास कामांचे नियोजन करताना होणारी कामे ही सुबक, दर्जेदार आणि देखणी असावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. सिडकोच्यावतीने आयोजित केलेल्या एकदिवशीय सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिट (आभासी-व्हर्च्युअल) चा शुभारंभ व सिडकोने उभारलेल्या कळंबोली आणि कांजूरमार्ग … Read more

पर्यावरण जपून शाश्वत विकास गरजेचा – आदित्य ठाकरे

मुंबई – पर्यावरण जपणे म्हणजे विकासाच्या विरोधात जाणे नसून पर्यावरण जपून शाश्वत विकास घडवून आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. वातावरणीय कृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष … Read more