कापूस, मका, गवार बी व सोयाबीनच्या भावात वाढ

या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले तसेच हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून हा सरासरीपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे. यापुढील किमती बहुतांश मॉन्सूनच्या प्रगतीवर अवलंबून आहेत. पेरण्या उशिरा होत असल्यामुळे उत्पादनाचे अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे भाव वाढले आहेत. रब्बी पिकांचे भाव … Read more

शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत

शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच … Read more

फळपिकांच्या उत्पादनासाठी ७१ सामूहिक शेततळी

परभणी जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानंतर्गत २०१८-१९ या वर्षात ७१ सामूहिक शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून उद्भवत असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी राहत आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गंत सामूहिक शेततळ्यांची निर्मिती करून त्यामध्ये शेतातील उपलब्ध पाणीस्रोतांचे पाणी साठवून संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. पावसाचा खंडकाळ तसेच उन्हाळ्यामध्ये शेततळ्यातील पाणी … Read more

मोठी बातमी ; शेणखताच्या दारात वाढ

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामामध्ये अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात … Read more

जाणून घ्या नारळ जाती, लागवडीबाबत माहिती….

नारळाची एक वर्ष वयाची, आखूड व जाड बुंधा असलेली, पाच ते सहा पानावरील, निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावीत. दोन ओळी व झाडांत ७.५ मीटर अंतर ठेवावे. नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने नारळ लागवड करताना ६.७५ किंवा सात मीटर अंतर ठेवावे. बुटक्या जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. जातींची माहिती : उंच … Read more

शेणखत वापरताना घ्या ही काळजी

गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते. शेणखत वापरताना घ्यावयाची काळजी  लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात व खड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून … Read more

चिकू लागवडीचे तंत्र

चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota,असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae)हे आहे . चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली … Read more

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. गेल्या महिना-दीड महिन्यापूर्वी लावलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्कर अळी या कीडची लागण झाल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याने बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी श्याम … Read more

फणसाचे प्रकार व त्यापासून बनणारे रुचकर पदार्थ

फणस हा वर दिसायला काटेरी असला तरी फणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. हे गरे रुचकर, मधुर व गोड असतात.त्यात “अ’ आणि “क’ जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्टतर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो. फणसाचे प्रकार … Read more

केळीच्या खोडापासून धागानिर्मिती

केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्‍य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.केळीचे खोड लवकर कुजत नसल्यामुळे आंतरमशागतीसाठी अडचणी येतात. मात्र, खोडापासून धागानिर्मितीमुळे ही अडचण दूर होण्यासोबत उत्पन्नही मिळू शकते. केळी खोडापासून धागानिर्मितीसाठी आवश्‍यक बाबी : केळी खोडापासून धागा काढणारे यंत्र कापलेल्या केळीझाडांचे खोड तीन पुरुष मजूर व २ स्त्री मजूर प्रतिदिवस विद्युत पुरवठा … Read more