‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ राज्यभरात व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार – अमित देशमुख

मुंबई – राज्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान व्यापक स्वरुपात राबविण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ति अस्मिता अभियान आणि  वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे.  … Read more

एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये; यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करा – यशोमती ठाकूर

अमरावती – प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातील गरीब आणि वंचित घटकांना घरकुल मिळवून दिले जाते. जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यादीतून काही तांत्रिक कारणांस्तव वगळण्यात आलेल्या गरजूंनाही घर कसे मिळवून देता येईल, असा प्रयत्न जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने करावा. एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. आवास योजनेबाबत ग्रामीण विकास यंत्रणेच्या … Read more

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य – विजय वडेट्टीवार

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने  दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार )  इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य शासनाने  मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना  तयार   केली आहे. … Read more

‘या’ व्यक्तींनी बदामाचे सेवन टाळावे

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बदाम नक्कीच असतात. बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं. बदामाने स्मरणशक्ती तल्लख होते. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबरच बदाम खाणे सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. परंतु काही व्यक्तींसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे.कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात.अशावेळी बदाम … Read more