शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका – अजित पवार

जळगाव – दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे अशीच सरकारची भूमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी येथे केले. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव यांच्या पाच लाख लिटर … Read more

महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उदय सामंत

मुंबई – राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Saman) यांनी केले. राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री … Read more

८.७२ आणि ६.९२ टक्के कर्जरोखेची परतफेड ११ जानेवारी 2022 रोजी

मुंबई – शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७२ टक्के कर्जरोखे (Debt bond) २०२२, व ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ ची परतफेड दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. वित्त विभागाच्या अधिसुचनेनुसार ६ जानेवारी २०१२ अनुसार ८.७२ टक्के आणि ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ अदत्त … Read more

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची मदतीची भूमिका – जयंत पाटील

सांगली – सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वाळवा, तासगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगावचा पूर्व भाग या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या द्राक्षबागा गेलेल्या आहेत. यांचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. … Read more

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील – विश्वजीत कदम

सांगली – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये अचानकपणे मोठा पाऊस झाल्यामुळे सरकारला नविन अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  या अडचणीवरही मात करण्यासाठी शासन सक्षम आहे. या संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना राज्य … Read more

राज्यातील ठिबक सिंचन क्षेत्र अधिक वाढण्यासाठी शासन प्रयत्नशील – दादाजी भुसे

मुंबई – राज्यातील ठिबक सिंचन क्षेत्र अधिक वाढावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. ठिबक सिंचन असोसिएशन सोबत विविध विषयांवर आज मंत्रालयात कृषिमंत्री श्री. भुसे यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कृषी सचिव … Read more

महिलांच्या कर्तृत्वाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – अब्दुल सत्तार

पुणे – महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. महिलांच्या सर्वांगीण आणि परिपूर्ण विकासासोबतच महिला शक्तीचा सन्मान व्हावा व त्यांच्या कर्तृत्वाला चालना देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. एसएनडीटी महाविद्यालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या … Read more

सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल – दिलीप वळसे-पाटील

पुणे – सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिषदेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष … Read more

समर्पित निधी प्राप्त करुन घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी – सन  2021 – 22 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर अखेर 170 कोटी मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 9.18 टक्के खर्च झाला आहे तसेच अनुसुचित जाती उपयोजनेच्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी  27.44 टक्के खर्च झाला आहे. समर्पित केलेला 44 कोटी 55 लक्ष निधी पुन्हा प्राप्त करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज … Read more

प्राध्यापकांचे सर्व प्रश्न सोडवून न्याय देण्यास शासन कटीबद्ध – उदय सामंत

औरंगाबाद – प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  केले. प्राध्यापक संघटने (बामुक्टा) तर्फे तर्द्थ प्राध्यापकांना पेन्शन मंजूर केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार सोहळा देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी … Read more