नवीन वर्षात सकारात्मक राहण्याचे ‘हे’ पाच सोप्पे उपाय, जाणून घ्या

तुमचे अनेक संकल्पही नवीन वर्षाच्या (New year) निमित्तानं सुरू झालेच असतील. येणाऱ्या दिवसांचा खऱ्या अर्थानं आनंद लुटण्यासाठी तुम्ही सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे… आणि त्यासाठी फार काही मेहनत घ्यायचीही गरज नाही. अगदी सोप्या आणि छोट्या उपयांमधून तुम्ही स्वत:ला सकारात्मक ठेवू शकता… रोजचं वर्कआऊट नकारात्मक विचारांतून आणि तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम हा नेहमीच फायदेशीर ठरतो. २०२० … Read more

महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उदय सामंत

मुंबई – राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Saman) यांनी केले. राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री … Read more

प्रसारमाध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी शासन व प्रशासकीय स्तरावरील नकारात्मक बाबी समोर आणाव्यात. परंतु सोलापूर जिल्ह्याची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा कशा पद्धतीने तयार होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. येथील फडकुले … Read more

‘मेस्को’च्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढणार – दादाजी भुसे

मुंबई – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाला (मेस्को) भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सर्वांगिण विचार करुन सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मेस्कोने सुरक्षा सेवा उपलब्ध करुन दिलेल्या विविध विभागांकडे असणारी प्रलंबित आर्थिक येणी लवकरात लवकर मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेस्कोची वार्षिक सर्वसाधारण सभा … Read more

मच्छिमारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक – दत्तात्रय भरणे

मुंबई – रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील मच्छिमारांच्या समस्यांचे नियमांतर्गत निराकरण करण्यात यावे. स्थानिक मच्छिमारांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय करताना मिनी पर्सेसीन बोटीला परवानगी मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, याचबरोबर खलाशी भरतीमध्ये पात्र स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. रायगड येथील स्थानिक मच्छिमारांना येणाऱ्या विविध समस्या, मत्स्य परवाना, जेट्टी बांधणे, खडींचे अडथळे, नोकरीत स्थानिकांना प्राधान्य, घरकुल, किसान क्रेडीट … Read more

वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक – अमित देशमुख

मुंबई – शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भातील बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार नाना पटोले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह,वैद्यकीय … Read more

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार – शंभूराज देसाई

मुंबई – राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या डीसीपीएस योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करून  संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या त्रुटींसंदर्भात गठीत करण्यात आलेल्या अभ्यासगटाचे अध्यक्ष तथा वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई … Read more