जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

नाशिक – गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा  मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास तशी … Read more

मंत्रिमंडळ निर्णय – अतिरिक्त विकास आयुक्त पद निर्माण करण्यास मान्यता

अतिरिक्त विकास आयुक्त पद निर्माण करण्यास मान्यता उद्योग संचालनालयात अतिरिक्त विकास आयुक्त हे पद निर्माण करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उद्योग संचालनालयात गेल्या 6-7 वर्षात कामकाज वाढले असून कृषी व अन्न प्रक्रीया धोरण राबविणे, निर्यात प्रचलन धोरणाची अंमलबजावणी करणे, मैत्री कक्षाचे कामकाज अधिक गतीमान करणे, उद्योगांचे प्रश्न … Read more

पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नाही – उद्धव ठाकरे

सोलापूर/पंढरपूर – पालखी महामार्गाच्या निर्मितीत महाराष्ट्र शासनाचा सहभाग असून या पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी ज्या काही आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या आहेत त्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. तसेच वाखरी येथे वारकऱ्याकडून  रिंगण सोहळा आयोजित केला जातो. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर हेही महामार्गाने जोडण्याचा केंद्र शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत … Read more

पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात – नरेंद्र मोदी

सोलापूर/पंढरपूर – संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे 231 व  130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. … Read more

कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात यावा – अमित देशमुख

मुंबई – नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर फाऊंडेशन मार्फत कर्करोग उपचाराच्या सोयीसुविधा पुरविल्या जातात. या ठिकाणी कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी विभागीय कॅन्सर हॉस्पीटल आणि संशोधन संस्थेच्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला … Read more

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड उष्णतामानामुळे हैराण झालेल्यांना जरा दिलासा मिळाला असला तरी, बदललेल्या या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही डॉक्टरकडे न जाता हा त्रास जर तुम्हाला घरच्या घरी बरा करायचा असेल तर जाणून घ्या उपाय… लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं … Read more