कृषी विभागाने केली राज्यातील बॅंकांची चांगलीच कानउघाडणी

राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “पीकविम्याच्या कामाबाबत काही बॅंका अतिशय बेफिकिरीने काम करतात. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाशिवाय कोणालाही जुमानायचेच नाही, असे धोरण काही बॅंकांचे आहे. आम्ही सूचना देऊनही उपयोग होत नव्हता; पण आता कृषी विभागानेच कानउघाडणी केल्याने बॅंकांना दखल घ्यावीच लागेल.” प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना बॅंकांकडून होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत कृषी विभागाने राज्यातील बॅंकांची चांगलीच … Read more

जांभूळ खाल्याने होणारे फायदे ….

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. … Read more

आले (आद्रक) लागवडीचे तंत्र

प्रस्‍तावना आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. ओले आले, प्रक्रिया करून टिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरुपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याच्या खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात. हवामान व जमीन आल्याला उष्ण व दमट हवामान मानवते. थंडीमुळे आल्याची पानेवाढ थांबते व … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेशी सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे 50 हजार रुपये अनुदान आणि मनरेगातून 45 हजार असे एकूण 95 हजार रुपयांचे अनुदान शेततळे खोदाईसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. आतापर्यंत 1 लाख 61 हजार शेततळी पूर्ण करण्यात आली असून 2 लाख 30 हजार शेततळ्यांची आखणी करुन ठेवण्यात आली … Read more

शेतकऱ्यांचे हाल ; कृषी कार्यालयाचा परमीट देण्यास नकार

नांदेड – दुष्काळामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी यंदाही बेजार झाले आहेत. आर्थिक घडी सावरण्यासाठी काढलेले कर्ज व सावकारी ओझ्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्याचा मार्ग निवडत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकार शेकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडत असले तरी त्याची अमंलबजावणी होताना दिसत नाही आहे. मान्सून जवळ येताच शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली. शेती पेरणीसाठी सज्ज … Read more

आरोग्यासाठी फायदेशीर जवस

यंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार आहेत. बाह्यस्वरूपी दिसायला लांबुळके, एका टोकाला अंडाकृती आणि दुसऱ्या बाजूला टोकदार असते. दोन्ही प्रकारच्या जवसाच्या प्रकारामध्ये पोषक घटक सम प्रमाणात … Read more

शेवंती फुलपिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान

फूलपिकाची ओळख व क्षेत्र  :  जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला. चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र … Read more

कागदी लिंबू लागवड

लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे. लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन … Read more

कापूस, मका, गवार बी व सोयाबीनच्या भावात वाढ

या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले तसेच हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून हा सरासरीपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे. यापुढील किमती बहुतांश मॉन्सूनच्या प्रगतीवर अवलंबून आहेत. पेरण्या उशिरा होत असल्यामुळे उत्पादनाचे अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे भाव वाढले आहेत. रब्बी पिकांचे भाव … Read more

शेतकऱ्यांना कृषी योजनांची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत

शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकरिता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसित करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना एकच … Read more