राज्यातील ‘या’ ३ जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका; भाजीपाल्याचे मोठे नुकसान

मुंबई – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटचा  पाऊस झाला आहे. तर राज्यातील औरंगाबाद , वाशिम , नागपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी (Premature) आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी (Premature) आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याच्या वाफ्यामध्ये पाणी साचले असून कोथींबीर, मेथी, पालक हे पाण्यात आहे. … Read more

राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई

पुणे – राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि  प्रतिष्ठा वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे यांनी केले. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांची नुकसानभरपाईसाठी राज्य शासन … Read more

राज्यातील 15 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; तब्बल 1.36 लाख हेक्टरवर नुकसान

पुणे – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी (Untimely rain) पावसाने हजेरी लावली. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान … Read more

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची मदतीची भूमिका – जयंत पाटील

सांगली – सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वाळवा, तासगाव, पलूस, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगावचा पूर्व भाग या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषत: द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या द्राक्षबागा गेलेल्या आहेत. यांचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. … Read more

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील – विश्वजीत कदम

सांगली – डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आणि विशेषत: द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. हवामानाची अनियमितता, अचानकपणे पडणारा पाऊस यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये अचानकपणे मोठा पाऊस झाल्यामुळे सरकारला नविन अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  या अडचणीवरही मात करण्यासाठी शासन सक्षम आहे. या संकटाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना राज्य … Read more

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणार – विजय वड़ेट्टीवार

चंद्रपूर – सावली तालुका आणि परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे सिंचनाची सोय झाली आहे. त्यामुळे या परिसरात धानासाठी बारमाही पाणी उपलब्ध आहे. मात्र, वरचा अवकाळी पाऊस आपल्या हाती नाही. काही दिवसांपूर्वी या भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चित मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री … Read more

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचे नुकसान

अमरावती मध्ये गुरुवारी पहाटे सर्वदूर झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामासह खरीप हंगामातील तूर पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. चांदूर बाजार, तिवसा, चांदूर रेल्वे या तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. या पावसामुळे संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे.दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतातील कापूस मातीमोल झाला असून संत्र्याच्या मृग बहाराची हानी झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून … Read more