जलजीवन मिशन योजनेंतर्गत ‘या’ परिसरातील ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १९० कोटींची तरतूद

मुंबई – जलजीवन मिशन (Aquatic Mission) कार्यक्रमांतर्गत भगवानगड परिसर ४६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येणार असून फेब्रुवारीमध्ये १९० कोटींच्या या कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व  स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील ४६ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा … Read more

जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील तब्बल 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

मुंबई – जलजीवन मिशन (Aquatic Mission) योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे … Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ द्यावा – गुलाबराव पाटील

जळगाव – प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविलंब त्यांच्या खात्यावर जमा करावी. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वसंबंधीत विमा कंपन्याचे प्रतिनिधी व यंत्रणांना दिलेत. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील … Read more

‘या’ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा – गुलाबराव पाटील

मुंबई – अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणीपुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत जलसंपदा आणि एमआयडीसीने समन्वयाने तातडीने सोडवावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अंबरनाथ शहराची पाण्याची मागणी 140 द.ल.लीटर असून प्रत्यक्षात 120 द.ल.लीटर पाणी … Read more

आपले आरोग्य आपल्या हाती, स्वच्छ हात धुवावे आणि आरोग्य सांभाळावे – गुलाबराव पाटील

मुंबई – स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी  हातांची स्वच्छता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपले आरोग्य आपल्या हाती आहे. स्वच्छ हात धुवून आपले  आरोग्य सांभाळले पाहिजे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. दि. 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यानिमित्ताने … Read more

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – गुलाबराव पाटील

मुंबई – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत सन २०२१ २२ या वर्षात केंद्र स्तरावरुन राज्यात ३४ जिल्ह्यातील ९१२ गावात स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ केले जाणार आहे. यावर्षीही स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. मंत्रालयात स्वच्छ भारत ग्रामीण  सर्व्हेक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले … Read more

‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ – गुलाबराव पाटील

जळगाव – कोरोना विषाणूमुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या आणि विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या बालकांच्या मागे राज्य शासन ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभे राहील. ‘मिशन वात्सल्य अंतर्गत’ अनाथ मुले व विधवांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल, असे प्रतिपादन  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. … Read more