वसतिगृह प्रवेश, स्वाधार व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने राबविणार – धनंजय मुंडे

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश पूर्णपणे संगणकीकृत करून ऑनलाईन (Online) पद्धतीने राबविण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले आहेत. मंत्रालयात संगणकीकृत ऑनलाईन (Online) प्रणालीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव … Read more

मोठा निर्णय : राज्यात ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ राबविणार

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ … Read more

तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार – नवाब मलिक

मुंबई – नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo – VC Mixer) हा उपक्रम आज येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रदर्शनात ५० स्टार्टअप्ससह साधारण ७० हून अधिक गुंतवणुकदारांनी सहभाग घेतला. तरुणांनी शोधलेल्या विविध स्टार्टअप्सच्या नवनवीन संकल्पनांची गुंतवणूकदारांनी पाहणी केली व त्यामध्ये गुंतवणुकीत स्वारस्य … Read more

राज्यातील ‘आयटीआय’च्या आधुनिकीकरणासाठी विविध उपाययोजना राबविणार – नवाब मलिक

मुंबई – राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यवतमाळ शासकीय आयटीआय, औरंगाबाद शासकीय आयटीआय आणि कुर्ला येथील डॉन बॉस्को खाजगी आयटीआय यांना अनुक्रमे राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. रक्कम अनुक्रमे ५ लाख, ३ लाख व २ … Read more

राज्यात उत्कृष्ट पद्धतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविणार – उदय सामंत

पुणे – राज्यातील विद्यार्थी देशातच नव्हे तर जगात दर्जेदार शिक्षणाने समृद्ध व्हावा यासाठी राज्यात उत्कृष्ट पद्धतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी केली जाईल. एनईपीमध्ये अजून काही चांगल्या बाबी  सुचवण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने राज्य शासनाला शिफारसींचा अहवाल दिला आहे. त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यकतेप्रमाणे केंद्र शासनाला शिफारसी … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार – उदय सामंत

मुंबई – कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ती ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय  सामंत यांनी दिली. मुंबईच्या सिडनॅहम … Read more

मोठा निर्णय: केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDAR) ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत  योजना आहे.  ही योजना 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. योजनेच्या 13 कोटी 70 लाख रुपये खर्चासही मंजुरी … Read more

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार – यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई – महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधीसेवेचे सहकार्य देऊन त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲड अविनाश गोखले आदी … Read more

मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार – संदीपान भुमरे

मुंबई – राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच पंजाब राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंजाबचे कृषीमंत्री गुरुदीप सिंग यांच्याशी सिट्रस प्रणाली राज्यात राबविण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार असल्याचे श्री. भुमरे यांनी सांगितले. या दौऱ्यात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ.कैलास मोटे, कृषी अधिकारी तुकाराम मोटे, फलोत्पादन … Read more