शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांवर काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे करावी – छगन भुजबळ

मुंबई – धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत, धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदीबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या … Read more

कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटपाची कार्यवाही तात्काळ करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई – कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा-या पर्यायी जमिनींबाबत सातारा, सागंली, सोलापूर, रायगड, ठाणे तसेच पालघर या जिल्हा प्रशासनांनी पात्र लाभार्थ्यांना मान्य असलेली जागा वाटपाची कार्यवाही तात्काळ करावी, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे कोयना प्रकल्प पुनर्वसनाचा आढावा बैठक झाली.या बैठकीत श्री.वडेट्टीवार बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसनचे … Read more

पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी – दत्तात्रय भरणे

मुंबई – प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अनुकंपाधारक, प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीतील आरक्षण आणि वन व्यवस्थापन समितीच्या कामकाजासंदर्भात आज मंत्रालयात … Read more

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळमुक्त अन्न पदार्थांसाठी प्रशासनाने कडक कार्यवाही करावी – राजेंद्र शिंगणे

मुंबई – सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी , असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. … Read more

कोविड बिलांचे लेखापरीक्षण गतीने करण्यासाठी कार्यवाही करा – राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई – खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या बिलांचे लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी यांनी विविध मुद्यांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर श्री. टोपे यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, … Read more

कोयना प्रकल्पग्रस्तांना जिल्ह्यामध्ये जमीन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई – कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर येथील जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी अथवा पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून तातडीने कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात पर्यायी जमीन मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक … Read more