बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास साधावा – दादाजी भुसे

नाशिक – बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी  विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. पळसे येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण तसेच नाशिक हनी बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून साकारलेल्या गोडवा गुळ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न … Read more

महिला सरपंचानी नियमांची माहिती व अभ्यासतून गावांचा सर्वागींण विकास करावा – सुभाष देसाई

औरंगाबाद – महिला सरपंचानी पदाला न्याय देण्यासाठी व जनतेच्या विश्वासाला पात्र  ठरण्यासाठी  परिपत्रके, शासन निर्णय यांची माहिती घेऊन गावागावात विकास कामांना गती द्यावी. पुरोगामी महाराष्ट्रात अनेक समाजसुधारकांच्या विचारातून विविध चालीरिती, प्रथा, परंपरा दूर करुन स्त्री शिक्षण व तिच्या विकासासाठी सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिल्याने समाजकारण व राजकारणात महिला सरपंच जनतेच्या विश्वासाला पात्र … Read more

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई – कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान … Read more

महिला व बालभवनचे काम तातडीने मार्गी लावावे!- यशोमती ठाकूर यांचे निर्देश

धुळे – महिला व बालकांशी निगडित राज्य शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली आणून महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी महिला व बाल भवनचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महिला व बालविकास … Read more

आर्थिक साक्षरतेतून होईल महिलांचे सक्षमीकरण – यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन

अकोला – महिलांकडे उपजत शहाणपण असते. महिला सक्षम होऊन त्यांना आर्थिक साक्षरता यावी. ही साक्षरता आली की महिलांचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी डाबकी जहांगीर येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर या होत्या. गोट बँक ऑफ कारखेडाच्या डाबकी जहांगीर येथील शाखेचे उद्घाटन … Read more

शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांची गरूडभरारी वाखाणण्याजोगी – हसन मुश्रीफ

मुंबई – गडचिरोली, यवतमाळ, वर्धा तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांतील महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत शेतीवर आधारित उत्पादक कंपन्या तयार करून जी गरूडभरारी घेतली ती वाखाणण्याजोगी आहे. महिलांनी या माध्यमातून शेती उत्पादनांसाठी ब्रँडींग, पँकेजिंग आणि ॲमेझॉन प्लॅटफार्मवर आपले उत्पादक आणण्याचा निर्णय घेऊन त्याद्वारे प्रगती साधल्याचा मला आनंद होत आहे. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे … Read more

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – दादाजी भुसे

धुळे – कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त … Read more

सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार – यशोमती ठाकूर

मुंबई – महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी नियम, कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याला प्राधान्य देऊन सर्व विभागांच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला धोरण 2014 मध्ये सुधारणा करुन सुधारित चौथ्या महिला धोरणाबाबत … Read more

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार – यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई – महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधीसेवेचे सहकार्य देऊन त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲड अविनाश गोखले आदी … Read more

आता शेतकरी महिला होणार कापूस खरेदीदार

जिवती – दोन वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाऊंडेशन अंतर्गत तालुक्यात उत्तम कापून उपक्रम सुरू आहे. ८ हजार ७१२ शेतकऱ्यांनी यात सहभाग घेतलेला आहे. उत्पादनात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व त्याचबरोबर जैविक शेती करून आंतपिक म्हणून चवळी, मका, वाल आदी पिके घेणे सुरू झाले. अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत होते. परंतु वर्षेभर शेतात मेहनत करायची … Read more