कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या विविध उपाययोजनांसाठी ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित

मुंबई – कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्त कोकण,विभागीय आयुक्त  पुणे, विभागीय आयुक्त नागपूर, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना एकूण ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोविड – १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू … Read more

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे – आदित्य ठाकरे

पुणे – कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण नवीन संशोधनाची गरज आपल्या लक्षात आली असून त्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील 3 टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार राज्यमंत्री तथा भारती … Read more

महत्वाची बातमी: रेशन धान्यांसाठी यापुढे कोरोना लसीकरण सक्तीचे

यवतमाळ : जिल्ह्यातील स्वस्त भाव दुकानावर धान्य वाटपादरम्यान मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका धारक लाभार्थी यांची गर्दी होते. त्यामुळे ज्या लाभार्थींनी कोविड लसीचे दोन्ही डोस पुर्ण केले. अशा लाभार्थींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिका धारकांनी लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्य शासनाकडून कोरोना … Read more

कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना छगन भुजबळ यांच्या हस्ते पाच लाखाचे सानुग्रह अनुदान प्रमाणपत्राचे वितरण

नाशिक – कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण दहा अनाथ बालकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात शासनाने जाहिर केलेल्या पाच लाखाच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव  प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वश्री आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार,डॉ. राहुल आहेर,सरोज अहिरे,जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस … Read more

आजपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार

मुंबई – कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद होती. म्हणजेच जवळपास ५७८ दिवसांनी आज बुधवारी सर्व महाविद्यालये उघडली आहेत. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील सर्व वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाशी … Read more

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम – मुख्यमंत्री

मुंबई – कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित … Read more

राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार – उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने  राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित … Read more

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव – जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी … Read more

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने गाठला ९ कोटी लस मात्रांचा टप्पा

मुंबई – राज्यातील नऊ कोटींहून अधिक नागरिकांना आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी  दिली. राज्यात काल सायंकाळी पाच वाजता नऊ कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्याचा टप्पा पार करण्यात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला यश आले. यापैकी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही … Read more

राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही – सुभाष देसाई

मुंबई – राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील 60 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे अनेक छोटे व्यवसाय थोड्याच कालावधीत मोठे झाले आहेत. आज लिस्टींग झालेले लघु व मध्यम उद्योगही लवकरच मोठे उद्योग म्हणून नावारुपाला येतील असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. … Read more