देशातील ‘या’ १३ राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचा केंद्र सरकारचा आदेश

नवी दिल्ली – पुन्हा एकदा जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांनी कोरोना चाचण्या (corona tests)वाढवण्याचा आदेश देशातील १३ राज्यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra)पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, नागालँड, सिक्कीम, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, राजस्थान, जम्मू-काश्मीर या राज्यांसह … Read more

रासायनिक खत वापर कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची केंद्र सरकारनेही घेतली दखल

मुंबई – शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि जैविक खतांचा वापर वाढावा यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची दखल केंद्र सरकारनेही घेतली. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यासंदर्भात राज्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविय यांना दिली. महाराष्ट्रा प्रमाणेच इतर राज्यांनी त्याचे अनुकरण करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री श्री. मांडविय यांनी दिल्या. दरम्यान, … Read more

बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई – केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड … Read more

केंद्र सरकारने तीनही जाचक कृषी कायदे रद्द केले, हा शेतकऱ्यांच्या धैर्याने दिलेल्या लढ्याचा विजयच! – धनंजय मुंडे

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.  सेच देशाची माफीही मागीतली आहे. … Read more

सर्वसामान्य शेतकऱ्यांची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला खोचक टोला

मुंबई :  कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चांगलेच टोमणे मारले आहेत. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि … Read more

शेतकऱ्यांपुढे केंद्र झुकले, या आंदोलनाची जगभर दखल घेतली जाईल – छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

मुंबई –  गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी सरकार शेतकाऱ्यांसामोर … Read more

नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे – अब्दुल सत्तार

पुणे – जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे योगदान असून आपल्या अधिकारांचा कार्यक्षम वापर करताना  नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महसूल व वन विभागांतर्गत आयोजित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस महसूल विभागाचे अपर … Read more

गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – शासनाचा एक घटक म्हणून काम करत असताना सर्वसामान्य गरीब माणूस केंद्र बिंदू ठेवून काम केलेले आहे. प्रत्येक गरीब लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आलेलो आहे व पुढे ही काम करत राहणार आहे. तरी इतरांनीही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे व त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने, … Read more

राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्ती केंद्र – शरद पवार

मुंबई – राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ … Read more

‘पीकविमा कंपनी केंद्र व राज्य शासनातील काही नेत्यांचा शेतकऱ्यांवर दरोडा’ – राजू शेट्टी

उस्मानाबाद – पीकविमा कंपनी केंद्र व राज्य शासनातील काही नेत्यांच्या सोबतीने शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. मात्र, आपण हे होऊ देणार नाही. येत्या १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे पिकविम्याची पूर्ण रक्कम द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी पीकविमा कंपनीला दिला आहे. जिल्ह्यात सोयाबीन … Read more