अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा – राजेंद्र शिंगणे

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष रहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न प्रशासनचे … Read more

अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – यशोमती ठाकूर

मुंबई – एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. सन २०२१-२०२२ या वित्तीय  वर्षासाठी भाऊबीज भेट दोन हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २८ … Read more

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – राज्यपाल

अहमदनगर – कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या  विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून  देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ

मुंबई – एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि. 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब … Read more

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३३ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई – महाराष्ट्र शासनाने 12 वर्षे मुदतीचे 3000 कोटी रुपयांचे 6.91 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2033 ची रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद … Read more

आपदग्रस्ताना एकूण ५ हजार २२१ कोटींची मदत – विजय वडेट्टीवार

मुंबई – राज्यात २०२१ या वर्षामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पूरस्थितीमुळे जुलैमध्ये झालेल्या शेतपिकाच्या  नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख व ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानिकरिता ४ हजार ८६४ कोटी असे  एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकारपरिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली … Read more

राज्यातील ‘या’ नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी; २ हजार ११७ कोटींच्या कामांना होणार सुरुवात

नवी दिल्ली – नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन  प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आज कॅबिनेटच्या खर्च व  वित्त समितीने (ईएफसी) मंजुरी दिली आहे, याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागनदी  पुनरुज्जीवन  प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून याअंतर्गत ९२ एमएलडी  क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन … Read more

राज्यातील ‘आयटीआय’च्या आधुनिकीकरणासाठी विविध उपाययोजना राबविणार – नवाब मलिक

मुंबई – राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यवतमाळ शासकीय आयटीआय, औरंगाबाद शासकीय आयटीआय आणि कुर्ला येथील डॉन बॉस्को खाजगी आयटीआय यांना अनुक्रमे राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. रक्कम अनुक्रमे ५ लाख, ३ लाख व २ … Read more

राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिवाळीपूर्वी सर्व मानधन देण्यात येणार – अमित देशमुख

मुंबई – राज्यातील वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजनेतील सुमारे ३० हजार पात्र मानधन धारकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सर्व मानधन जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. श्री.देशमुख यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२१ अखेरपर्यंतचे मानधन अदा करण्यात येत असून, यासाठी २८ कोटी रुपयांची तरतूद प्राप्त झालेली आहे. राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत … Read more

मुतखड्याची लक्षणे व त्यावरील काही उपाय, माहित करून घ्या

लघवीच्या मार्गात तयार होणारा कठीण स्फटिकजन्य पदार्थ मुतखडा म्हणून ओळखला जातो. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ एकाच जागी जमा होऊन मुतखडा निर्माण करतात. मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे रूपांतर मुतखड्यात होते. ही आहेत मुतखड्याची लक्षणे मुतखड्याची लक्षणे साधारणपणे दिसून येत नाहीत. मुतखड्याची मूत्रमार्गात हालचाल होऊन अडथळा येतो त्यावेळी … Read more