सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – अजित पवार

अहमदनगरसर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जामखेड शहर … Read more

नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे – अब्दुल सत्तार

पुणे – जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे योगदान असून आपल्या अधिकारांचा कार्यक्षम वापर करताना  नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महसूल व वन विभागांतर्गत आयोजित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस महसूल विभागाचे अपर … Read more

गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – शासनाचा एक घटक म्हणून काम करत असताना सर्वसामान्य गरीब माणूस केंद्र बिंदू ठेवून काम केलेले आहे. प्रत्येक गरीब लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आलेलो आहे व पुढे ही काम करत राहणार आहे. तरी इतरांनीही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे व त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, वने, … Read more

महिला व बालभवनचे काम तातडीने मार्गी लावावे!- यशोमती ठाकूर यांचे निर्देश

धुळे – महिला व बालकांशी निगडित राज्य शासनाचे विविध विभाग एकाच छताखाली आणून महिला व बालकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी महिला व बाल भवनचे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात महिला व बालविकास … Read more

दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा, एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – अनिल परब यांचे आवाहन

मुंबई – एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. श्री. परब … Read more

पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज; प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी कामांना गती द्यावी – गुलाबराव पाटील

मुंबई – जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात विविध  ठिकाणी सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे याकामी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांकडून कामे गतिमान होतील, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांच्या (पीएमसी) कामकाजासंदर्भात … Read more

प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी काम केले पाहिजे – सुनील केदार

वर्धा – तुम्ही आम्ही सगळे शेतकऱ्यांचीच मुले आहोत. शेतकरी संकटात आहे, त्यास विविध कारणे आहेत. शेतकरी राहिला तरच आपण राहू, त्यामुळे प्रत्येकाने शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी काम केले पाहिजे, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. आर्वी कृषि उत्पन्न बाजार समितीस आज पालकमंत्र्यांनी भेट दिली तसेच येथील शेतकरी सहकरी जिनिंग व प्रेसिंगच्या गोदामाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले. कला वाणिज्य … Read more

महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम जमा

राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ ही योजना २७ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना … Read more

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 चे पिकाची नुकसान भरपाई वाटप होणार

बीड : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई मार्फत राबविण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातून 21.62 लाख अर्जदार शेतकऱ्यांनी 7.64 लाख क्षेत्राचे पीकसंरक्षित करून 7422.54 लाख विमा हफ्ता भरलेला होता.विमा कंपनीकडून अधिसूचित असलेल्या पिकांपैकी तुर, कापूस व कांदा या पिकाची नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मंजूर होऊन … Read more