दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात येणार – विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी दिली आहे. … Read more

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई – इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत मोठ्या … Read more

जागतिक दर्जाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी घडवावेत – अजित पवार

पुणे – माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून काळाची गरज लक्षात घेता शिक्षण संस्थांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार अशोक पवार, माजी … Read more

धान्याची उचल न करणाऱ्या शिधापत्रिका धारकांची माहिती घ्या – छगन भुजबळ

चंद्रपूर – गरजूंना दोन वेळच्या अन्नाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु काही शिधापत्रिकाधारक धान्याची उचल करत नसल्यामुळे धान्याचा साठा पडून राहतो. परिणामी धान्य वाया जाते. कार्डधारक धान्याची उचल का करत नाही, तसेच कधीपासून संबंधित लाभार्थ्याने धान्याची उचल केली नाही, याबाबत माहिती घ्यावी. शहरी भागात ५९ … Read more

ऊसाचे फुटवे व्यवस्थापनाची जाणून घ्या माहिती फक्त एका क्लिकवर

गणित, मृद स्थापत्य शास्त्र, मृद रसायन शास्त्र, मृद भौतिक शास्त्र, जीव रसायन शास्त्र, हवामान शास्त्र, खनिज शास्त्र, वनस्पती शरीर शास्त्र, अर्थशास्त्र, कृषिविद्या शास्त्र, कीटक शास्त्र आणि वनस्पती जनन शास्त्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करावयास पाहिजे. यशस्वी उस बागायती मध्ये अनेक विज्ञान विषयाचा सहभाग आहे. या प्रत्येक शास्त्रातील काही आडाखे महत्वाचे आहेत की जे आपण आत्मसात केले … Read more

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. चला तर जाणून घेऊ फायदे…. तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत … Read more

जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी श्री.टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात श्री. टोपे मंत्रालयातून सहभागी झाले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल … Read more

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार – यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई – महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधीसेवेचे सहकार्य देऊन त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲड अविनाश गोखले आदी … Read more

‘या’ दिवसापासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार; अमित देशमुख यांनी दिली माहिती

मुंबई – कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. महसूल व वन … Read more

गूळ खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात … Read more