घोडेगाव बाजार समितीमध्ये कांद्यास कमाल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर

घोडेगाव बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवारीया दिवसामध्ये कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यभरात कांद्याचे भाव तेजीत आहेत. बहुतांशी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. … Read more

कांदा झाला सव्वाशे पार; बाजारात नव्या कांद्याची आवक होऊनही दरात उतार नाही

शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला काल वणी इथल्या उपबाजारात १२ हजार रूपयेप्रती क्विंटल इतका विक्रमी भाव मिळाला. कळवण इथं कांद्याला ११ हजार रुपये भाव मिळाला. लासलगाव … Read more

इजिप्तचा कांदा मुंबई एपीएमसीत पुष्पा ट्रेडिंग कंपनीकडे दाखल

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. अशात जे काही थोडे फार पिकं वाचलेत त्यांना आता चांगले बाजारभाव मिळण्याचे चित्र दिसत असतानाच सरकारने शेतकऱ्यांच्या या थोड्याफार आनंदावर विरजण फेरलं आहे. परतीच्या पावसामुळे नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातील कांद्याचे भाव प्रती किलो 60 ते 65 रूपये किलो झाल्याने गुरूवारी 14 नोव्हेंबर रोजी … Read more

आता केंद्र सरकार इजिप्त, तुर्कस्तानमधून १ लाख मेट्रिक टन कांदा करणार आयात

पावसाचा आणि पुराचा फटका कांद्याला बसल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडत असल्याने केंद्र सरकारने एमएमटीसीला येत्या महिन्यासाठी तातडीने १ लाख मेट्रिक टन कांद्याची आवक करण्याचे आदेश दिले आहेत. इजिप्त, तसेच तुर्कस्तानमधून हा कांदा आयात केला जाणार असून, त्याच्या देशांतर्गत वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे. देशातील … Read more

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी 1 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आयात कांदा देशभरात पोचवण्याच्या सूचना नाफेडला देण्यात आल्याचं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी काल सांगितलं. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नेमकी कांद्याची काढणी सुरू असताना दोन्ही राज्यात जोरदार पाऊस … Read more

अजून महिनाभर राहणार कांद्याचे दर तेजीत

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला … Read more

कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या, नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याचे भाव सरासरी 450 रुपयांनी घसरले. काल कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार 201 ते 3 हजार 13 रुपये इतका भाव मिळाला. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा … Read more

कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे…

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे… कांद्याचा रस पिणे किंवा त्याने तळवांना मालिश करणे खूप फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्याने … Read more

कांदा लागवड पद्धत

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा … Read more