ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू

अकोला : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये आतापर्यंत 5 ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये (Dombivali) आलेला एक 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron positive) आढळला आहे. रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग, राज्य सरकार … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल ४१ साखर कारखाने सुरू

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात  ०२ डिसेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८६ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ सहकारी कारखान्यांचा समावेश … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरू

मुंबई – यंदा राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर राज्यात तब्बल १७२ साखर कारखाने सुरु झाले आहे. राज्यात ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखेरपर्यंत तब्बल १७२ साखर कारखान्यांनी ऊसाचा गाळप सुरू केले आहे. तर यामध्ये राज्यातील ८६ खासगी व या मध्ये राज्यातील ८६ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. … Read more

प्रसारमाध्यमांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे – दत्तात्रय भरणे

सोलापूर – जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी शासन व प्रशासकीय स्तरावरील नकारात्मक बाबी समोर आणाव्यात. परंतु सोलापूर जिल्ह्याची राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा कशा पद्धतीने तयार होईल यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन व दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. येथील फडकुले … Read more

‘महाबॅंके’कडून जिल्ह्यातील ५८२ महिला बचत गटांना ८ कोटी १३ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप

अमरावती – बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी काढले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी … Read more

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ द्यावा – बाळासाहेब पाटील

मुंबई – औरंगाबादमधील आडगाव बुद्रुक, निपाणी व सातारा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पात्र ठरलेल्या 225 लाभार्थींना महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत कर्जमुक्ती देण्यात यावी, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. मंत्रालयात औरंगाबाद तालुक्यातील आडगाव बु., सातारा व निपाणी  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सभासदांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ … Read more

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध

पुणे : उद्यापासून सुरु होणाऱ्या  पुण्यातील चित्रपट आणि नाट्य गृहात प्रेक्षकांच्या संख्येवर निर्बंध नसतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पुन्हा निर्बंध घालावे लागत आहेत. मायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे. पुण्यातील खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी 25 … Read more

‘या’ जिल्ह्यामध्ये आलेल्या ऊस तोडणी मजुरांचे शेतात जावून लसीकरण

कोल्हापूर –  मराठवाड्यातून हजारो मजुर अनेक ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत.  तर हे हजारो मजूर कोल्हापूर जिल्ह्यात आल्यामुळे आरोग्य अधिकारी चिंतेत आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या  मजुरांनी कोविडची पहिली लसही घेतलेली नाही. त्यामुळे  गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर्स, नर्स, आशा वर्कर्सकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गावातील ऊसाच्या शेतात जावून लसीकरण करण्यात येत आहे. राज्यातील असा एकमेव … Read more

‘या’ दोन जिल्हा परिषदांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मुंबई – भंडारा  आणि गोंदिया जिल्हा परिषद; तसेच त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान आणि 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 आणि त्यांतर्गतच्या 7 पंचायत समित्यांच्या 104; तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 आणि त्यांतर्गतच्या 8 पंचायत … Read more

राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान

मुंबई – राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत … Read more