महत्वाची बातमी: रेशन धान्यांसाठी यापुढे कोरोना लसीकरण सक्तीचे

यवतमाळ : जिल्ह्यातील स्वस्त भाव दुकानावर धान्य वाटपादरम्यान मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका धारक लाभार्थी यांची गर्दी होते. त्यामुळे ज्या लाभार्थींनी कोविड लसीचे दोन्ही डोस पुर्ण केले. अशा लाभार्थींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिका धारकांनी लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्य शासनाकडून कोरोना … Read more

‘या’ शहरातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवा – गुलाबराव पाटील

मुंबई – अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणीपुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत जलसंपदा आणि एमआयडीसीने समन्वयाने तातडीने सोडवावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अंबरनाथ शहराची पाण्याची मागणी 140 द.ल.लीटर असून प्रत्यक्षात 120 द.ल.लीटर पाणी … Read more

पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी – दत्तात्रय भरणे

मुंबई – प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अनुकंपाधारक, प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीतील आरक्षण आणि वन व्यवस्थापन समितीच्या कामकाजासंदर्भात आज मंत्रालयात … Read more

केंद्राचा मोठा निर्णय: प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान 90 ते 100 कोटीं रुपयाचा खर्च करणार

नवी दिल्ली – देशातल्या आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियान सुरू करण्यात आलं आहे. त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान 90 ते 100 कोटीं रुपयाचा खर्च केला जाईल,असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल या योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार … Read more

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड उष्णतामानामुळे हैराण झालेल्यांना जरा दिलासा मिळाला असला तरी, बदललेल्या या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही डॉक्टरकडे न जाता हा त्रास जर तुम्हाला घरच्या घरी बरा करायचा असेल तर जाणून घ्या उपाय… लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं … Read more

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर

मुंबई – राज्यात मागील २ ते ३ महिन्यात म्हणजेच जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी येत आहे कि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार ८६० कोटी ८४ लाख रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या … Read more

आंबा लागवड पद्धत, जाणून घ्या

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. जमीन  मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी सुधारित जाती  व संकरित जाती हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, … Read more

समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – यशोमती ठाकूर

मुंबई – समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मागण्या संदर्भात उच्चस्तरीय समितीकडे … Read more

अधिक उत्पन्न देणाऱ्या काजूचे वाण विकसित करण्याच्या ‘या’ विद्यापीठाला अजित पवार यांच्या सूचना

मुंबई  कोकणाच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात … Read more

राज्यातील अवयवदान वाढविण्यासाठी आराखडा तयार करा – राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई – राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पणाबाबत आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे झालेल्या या बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव-2 … Read more