‘मेस्को’च्या अडचणींवर सकारात्मक मार्ग काढणार – दादाजी भुसे

मुंबई – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाला (मेस्को) भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत सर्वांगिण विचार करुन सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मेस्कोने सुरक्षा सेवा उपलब्ध करुन दिलेल्या विविध विभागांकडे असणारी प्रलंबित आर्थिक येणी लवकरात लवकर मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मेस्कोची वार्षिक सर्वसाधारण सभा … Read more

बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई – केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड साहित्य उप-अभियान (एसएमएसपी) या योजनेतील बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी बाबतचा आढावा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. या योजनेत चांगल्या पद्धतीने सुरु असलेल्या शेतकरी बियाणे उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, अन्नधान्य उत्पादक संघ आदींचा सहभाग घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. केंद्र पुरस्कृत बियाणे व लागवड … Read more

डाळिंब परिसंवादामध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाही होण्याचे दादाजी भुसे यांनी केले आवाहन

मालेगाव – सुमारे एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासह प्रतितास 2 मेट्रिक टन क्षमतेचे धान्य चाळणी यंत्र उभारणी करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मालेगाव बाजार समितीमार्फत झाले आहे. ही बाजार समिती संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब … Read more

बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास साधावा – दादाजी भुसे

नाशिक – बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी  विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. पळसे येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण तसेच नाशिक हनी बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून साकारलेल्या गोडवा गुळ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न … Read more

ब-सत्ता मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नाही – दादाजी भुसे

मालेगाव – ब-सत्ता प्रकार म्हणून नोंदविलेल्या आणि निवासी, कृषिक, वाणिज्यीक, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. ब-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नसून नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह  डिसेंबर 2021 पुर्वी अर्ज दाखल करावे असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी … Read more

दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी  दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या … Read more

शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचावे – दादाजी भुसे

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी  दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या … Read more

‘विकेल ते पिकेल’ योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना सामावून घ्या – दादाजी भुसे

धुळे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसह नावीण्यपूर्ण योजनांमध्ये धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांच्या समावेश करून घ्यावा, अशा सूचना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. कृषी मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी महाविद्यालयातील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार … Read more

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – दादाजी भुसे

धुळे – कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त … Read more

फळपीक विम्याचा केंद्राचा हिस्सा तातडीने देण्याची दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना केली मागणी

मुंबई – राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये  148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री … Read more