कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय – अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई – कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान महोदयांचे आभार. … Read more

‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, … Read more

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले. यावेळी पंतप्रधान … Read more

मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वादग्रस्त कृषी कायदे घेतले मागे

नवी दिल्ली – केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्याची घोषणा केल्यानंतर या कायद्यांना प्रचंड विरोध झाला. शेतकरी संघटनांनी हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्लेच्या सीमेवर ठिया मांडला होता. केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. तसेच अनेक राज्यांनी … Read more

कृषी विद्यापीठाच्या संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतिकारक बदल : कृषीमंत्री

मालेगाव – कृषी विद्यापिठाच्या विविध संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल घडून आले आहेत. त्यामुळे डाळिंब परिसंवादामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डाळिंब बागायतदार संघ व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने … Read more

‘या’ जिल्ह्याची कृषी समृद्धीकडे वाटचाल

पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 469699 हेक्टर इतके असून लागवडीखालील क्षेत्र 133047 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप हंगामात 110000 लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 105 टक्के क्षेत्रावर लागवड झालेली आहे. पिकांसाठी लागणारे खते  नियोजनाप्रमाणे पुरवठा झालेला असून कुठलाही तुटवडा झालेला नाही. कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचा कृषी क्षेत्रात असलेला … Read more

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – राज्यपाल

अहमदनगर – कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या  विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून  देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान … Read more

राज्यपालांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद; कृषी विद्यापीठाच्या विविध विभागांची केली पाहणी

अहमदनगर – महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतीमध्ये आधुनिकता आणता आली. त्यामुळे  शेतीमध्ये उन्नती झाली असल्याची भावना राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्याशी  संवाद साधतांना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रगतशील शेतकरी कृषीभूषण डॉ.दत्तात्रय बने, सुरसिंग पवार, मच्छिंद्र घोलप, विष्णू जरे, मेजर ताराचंद घागरे, राजेंद्र वरघुडे, प्रविण गाडे, मारूती गिते, प्रणव धोंडे, सविता नारकर, शिवाजी … Read more

शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होण्यासाठी ‘कृषी कर्ज मित्र’ योजना – हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई – इच्छुक पात्र शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागाच्या ‘कृषी कर्ज मित्र’ योजनेस शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागाने निर्गमित केला असल्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाकरिता राष्ट्रीयकृत बँका, सहकारी तसेच खाजगी बँका आणि पतपेढ्यांमार्फत मोठ्या … Read more

कृषी विभागाच्या योजना महिलांसाठी 30 टक्के राखीव – दादाजी भुसे

धुळे – कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व कृषी महाविद्यालय, धुळे यांच्या संयुक्त … Read more