देशातील ‘या’ १३ राज्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचा केंद्र सरकारचा आदेश

नवी दिल्ली – पुन्हा एकदा जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. यामध्ये राज्यांनी कोरोना चाचण्या (corona tests)वाढवण्याचा आदेश देशातील १३ राज्यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra)पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, नागालँड, सिक्कीम, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, राजस्थान, जम्मू-काश्मीर या राज्यांसह … Read more

देशाचा पंतप्रधान कितीही आडमुठा असला तरी शेतकऱ्यांनी त्याला बरोबर चालवण्याची व्यवस्था केली – नाना पटोले

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तसेच देशाची माफीही मागीतली आहे.. हा निर्णय जाहीर करताच यावर देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मोदी … Read more

देशात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची झाली नोंद

मुंबई – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 8 हजार 488 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर सध्या देशात मात्र कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट पाहायला मिळत आहे. तर देशात गेल्या 24 तासांत  249 कोरोना  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात तब्बल 538 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. . देशात काल (2१ नोव्हेंबर) … Read more

सर्वसामान्य शेतकऱ्यांची ताकद देशाला कळली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला खोचक टोला

मुंबई :  कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला चांगलेच टोमणे मारले आहेत. मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि … Read more

आपल्या देशातील शेतकरी महान आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना झुकायला लावलं – नवाब मलिक

नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, … Read more

‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, … Read more

राज्याबाहेरील व देशाबाहेरील रंगकर्मींसाठी ऑनलाईन स्पर्धा – अमित देशमुख

मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर गतवर्षी रद्द करावी लागलेली, हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा यावर्षी डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज केली.  सांस्कृतिक कार्य संचालनालयमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध केंद्रांबरोबरच राज्याबाहेरील संघांसाठी एक व देशाबाहेरील संघांसाठी एक अशी दोन नवीन ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी … Read more

लसीकरणाबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठ्या प्रमाणावार लसीकरण करावे, असे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी … Read more

केंद्राचा मोठा निर्णय: प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान 90 ते 100 कोटीं रुपयाचा खर्च करणार

नवी दिल्ली – देशातल्या आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियान सुरू करण्यात आलं आहे. त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान 90 ते 100 कोटीं रुपयाचा खर्च केला जाईल,असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल या योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार … Read more

देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार – सुनिल केदार

पुणे – जागतिक अंतरावरील सर्वोत्तम अभ्यासक्रम असलेले आणि देशाला अभिमान वाटेल असे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा आणि युवक  कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे म्हाळुंगे-बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रच्या नियामक परिषद सदस्यांच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाला शालेय शिक्षण व … Read more