ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’; टास्क फोर्सचा अहवाल सादर

मुंबई – राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणीसंदर्भात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘शरद शतम्’ आरोग्य योजनेची कार्यपद्धती व समाविष्ट करावयाच्या आरोग्य तपासण्या यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून या योजनेला मंत्रिमंडळ मान्यतेसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश … Read more

भेसळमुक्त, सकस आहाराला नागरिकांनी प्राधान्य द्यावे – राजेंद्र शिंगणे

औरंगाबाद – सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी सकस, चांगले, सर्व जीवनसत्वे असलेले आणि भेसळमुक्त अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे अन्न नागरिकांना मिळावे यासाठी शासनस्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  अन्न औषध प्रशासन विभागाकडून आस्थापनांची तपासणी, दोषींवर कारवाई करण्यात येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाकडून प्राधान्य देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी  सांगितले. … Read more

स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा – बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना

सातारा –  सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे    सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या  सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या. सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) अंतर्गत रस्ता रुंदीकरण (सहा पदरीकरण) डीपीआरबाबत पालकमंत्री … Read more

नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे – अब्दुल सत्तार

पुणे – जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे योगदान असून आपल्या अधिकारांचा कार्यक्षम वापर करताना  नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महसूल व वन विभागांतर्गत आयोजित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस महसूल विभागाचे अपर … Read more

राज्यातील सर्व नागरिकांना ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत श्री. टोपे मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी … Read more

नागरिकांच्या समस्यांच्या तत्काळ निराकरणासाठी शासन कटिबद्ध – यशोमती ठाकूर

अमरावती – नागरिकांच्या विविध समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी 178 तक्रारींचा आज निपटारा करण्यात आला असून आवश्यक तिथे शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय व कार्यवाही करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी शासकीय विश्रामगृह … Read more

विकास कामे पूर्ण करण्यासोबतच नागरिकांनी स्वच्छतेवर भर द्यावा – छगन भुजबळ

नाशिक – कोरोना अद्याप संपलेला नाही, परंतु प्रार्दूभाव काही प्रमाणात कमी झाल्याने हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असून अर्थचक्राला गती प्राप्त होत आहे. शहरातील विकास कामे पूर्ण करण्याबरोबरच नागरिकांनी स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज पालकमंत्री छगन … Read more

शासन खंबीरपणे नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी – यशोमती ठाकूर

अमरावती – नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये, असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला. जिल्ह्यात जुलै महिन्यात … Read more

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ

नाशिक –  जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत  असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, … Read more

सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा – हसन मुश्रीफ

पुणे – राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी, जिल्हा … Read more