राज्यातील ‘या’ भागात ऐन दिवाळीत जोरदार पाऊस; ; मका, कापूस, तूरीचे मोठे नुकसान

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गंगाथडी परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गतवर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने, ढगफुटीच्या पावसाने हाहाकार उडाला होता. त्यावेळी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मका, कापूस, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, बाजरी, ऊस तसेच कडधान्ये, कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. याआधी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोरसर … Read more

पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी वितरित करा – अशोक चव्हाण यांचे निर्देश

नांदेड – अतिवृष्टी व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वत: जिल्ह्यातील विविध गावात नुकसानग्रस्त क्षेत्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन धीर दिला होता. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आज त्यांनी आढावा बैठक घेतली. यात मार्च ते सप्टेंबर 2021 या कालवधीत एकूण 455 कोटी 72 … Read more

दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे

अकोला – बियाण्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची स्वयंपूर्णता व्हावी,हे ध्येय्य ठेवून राज्याचा कृषी विभाग नियोजन करून वाटचाल करीत आहे, अशी माहिती राज्याचे कृषी ,माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी  दिली. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजना आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील समिती सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या … Read more

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई – ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 26 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित केला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या काळात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि … Read more

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – जिल्हयात माहे 01 जून 2021 ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकुण 90 महसूल मंडळा पैकी 53 महसूल मंडळात (65 मि.मी पेक्षा जास्त पर्जन्यमान) अतिवृष्टी झाली. तसेच जिल्ह्यात या कालावधीत बऱ्याच भागात सततचा पाऊस पडत होता. त्यामुळे नदी, नाला व ओढे यांना पुरही आले. परिणामी, नदीकाठच्या शेतात पाणी साचून किंवा शेतातील पाण्याचे निचरा … Read more

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पावले उचलण्याची दादाजी भुसे यांनी केली मागणी

मुंबई – राज्यात जुलै-2021 मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 900 कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह … Read more

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल तत्काळ केंद्र सरकारला पाठवावा; ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उस्मानाबाद – राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. माघील २ महिन्या पाहिले  झालेल्या अतिवृष्टीचा अहवाल राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये केंद्राकडे पाठविला, केंद्राने तत्काळ दखल घेत १५ दिवसांच्या आत केंद्रीय पथक पाठवून पाहणी केली. नुकसानीच्या माहितीचा अहवाल पाठविण्यात होत असलेली दिरंगाई टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामध्ये स्वत: लक्ष द्यावे व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने … Read more

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आगोदरच मदत मिळणार – राजेश टोपे

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून दहा हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एनडीआरएफच्या नियमात जी मदत बसते ती मदत दिवाळीच्या आगोदरच देण्याची व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने केली आहे. नंतर झालेल्या नुकसानीची मदत जी मंत्रीमंडळाने अत्ताच मान्य केली ती दिवाळीनंतर मिळेल. असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. एकूण … Read more

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणार ५५५.३९ कोटी

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण ५५५.३९ कोटींची आर्थिक मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या या आर्थिक मदतीबाबत पालकमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल १०० कोटींचे झाले नुकसान

औरंगाबाद – पावसाने औरंगाबाद जिल्ह्यचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  झाले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात जवळपास १०४ कोटी ९७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नुकसानीची माहिती पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सादर केली. यात रस्त्यांची दुरूस्ती, पुलांची कामे, इमारत दुरूस्ती, नाल्यांची दुरूस्ती या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली … Read more