अजून महिनाभर राहणार कांद्याचे दर तेजीत

परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहणार आहेत. त्यानंतर मात्र काही प्रमाणात दर कमी होणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत जी आवक होत आहे. तो भिजलेला कांदा आहे. त्यामुळे त्याचा दर्जा खालावलेला … Read more

कांद्याचे भाव घसरले , लासलगाव आणि पिंपळगावात आवकही घटली

कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या, नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल कांद्याचे भाव सरासरी 450 रुपयांनी घसरले. काल कांद्याला प्रति क्विंटल 1 हजार 201 ते 3 हजार 13 रुपये इतका भाव मिळाला. गेल्या २४ तासांत क्विंटलला पन्नास रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. एवढेच नव्हे, तर साडेचार हजार रुपयांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत कांदा … Read more

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किंमतीमध्ये वाढ केल्यामुळे शेतकर्‍यांना मिळाला दिलासा

केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामासाठी मध्यम व लांब धाग्याच्या कापसासाठी अनुक्रमे प्रतिक्विंटल ५२५५ व ५५५० रुपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे केवळ १०५ व १०० रुपयांची वाढ मिळाली आहे. २०१९-२०२० सालची ‘एमएसपी’ जाहीर करण्यात आली. गेल्या खरीप हंगामात (२०१८-१९) … Read more

बाजार समित्यांमध्ये मुगाच्या दरात वाढ

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकरी खरीपाच्या पेरणीची घाई करीत आहेत. अशात बाजार समित्यांमध्ये मुगाचे दर वाढून ६ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर झाले आहेत. बाजारात सध्या उन्हाळी मुगाची खरेदी होत असली तरी, पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांना या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. शासनाने गतवर्षीच्या हंगामात मुगाला … Read more

आवक कमी झाल्याने पालेभाज्या कडाडल्या

गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने सर्वच पिकांवर त्याचा परिणाम झाला असून कडधान्याची आवक घटल्याने त्यांचेही भाव वाढत गेले. त्यात यंदाही जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असला तरी पाऊस नसल्याने व उन्हाच्या झळा कायम असल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होत आहे. भाजीपाल्याची आवक दिवसेंदिवस घटत असून त्यांचे भाव वाढत आहे. पालेभाज्यांचे भाव सर्वाधिक वाढत असून मेथीची जुडी … Read more

कापूस, मका, गवार बी व सोयाबीनच्या भावात वाढ

या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले तसेच हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून हा सरासरीपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे. यापुढील किमती बहुतांश मॉन्सूनच्या प्रगतीवर अवलंबून आहेत. पेरण्या उशिरा होत असल्यामुळे उत्पादनाचे अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे भाव वाढले आहेत. रब्बी पिकांचे भाव … Read more

मोठी बातमी ; शेणखताच्या दारात वाढ

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामामध्ये अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना घेता आले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात … Read more

कोथिंबीर , पालेभाज्यांच्या दारात वाढ

पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्यात कोथिंबीरचे  उत्पादन चांगल्या प्रमाणातअसून, दैनंदिन बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी दाखल होत आहे. गुजरात राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर मालाची मागणी वाढली आहे. गुजरात राज्यासह मुंबई, पुणे बाजार समितीत कोथिंबीर मालाची मागणी वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न … Read more

मोठी बातमी – तूरडाळीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ

तूरडाळीचे भाव गेल्या दोन महिन्यांत 20 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात तूरडाळीचे भाव प्रति किलो 90 ते 110 रूपये या दरम्यान आहेत. तुरीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सध्या तुटवडा पडत आहे. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे आणि खरेदीचे प्रमाण वाढल्यामुळे यंदा तुरीची टंचाई जाणवत आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार देशात 2018-19 मध्ये 36.8 लाख टन तुरीचे उत्पादन … Read more

दुष्काळात तेरावा ; खताच्या किमतीत वाढ

एकीकडे खरीप हंगामासाठी शेतकरी सज्ज झाला आहे तर दुसरीकडे खताच्या किंमती वाढल्या आहेत़. निसर्ग व मानवनिर्मित संकटाचा सामना यंदाही शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे़ शेतीची मशागत केल्यानंतर पेरणीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे़. मात्र यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याने मृग नक्षत्र कोरडा जाण्याची भीती आहे़ आणखी एक आठवडाभर पावसाचे आगमन होणार … Read more