कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या लाटेत संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाने कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात याव्यात. चाचण्यांच्या सुविधा वाढवून तातडीने चाचणीचे अहवाल मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशा सूचना पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात … Read more

कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – सध्या राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातील रूग्णवाढ लक्षात घेता आरोग्य यंत्रणेनी सज्ज रहावे. जिल्ह्यात सध्या सक्रीय रूग्णसंख्या वाढत आहे. तरी प्रत्येकाने तोंडावर मास्क वापरावा, लसीकरण केले नसल्यास लसीकरण करून घ्यावे, दुसरा डोस आलेल्या लाभार्थ्यांनी दुसरा डोस घ्यावा, गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक सुरक्षा … Read more

जिल्ह्याच्या गरजेनुसार आरोग्य सुविधांवर भर द्या – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा बळकट करावी लागणार आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शस्त्रक्रियांसाठी लागणारी सामुग्री खरेदी करताना गरजेनुसार आरोग्य सुविधा उपकरणे खरेदीवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी दिले. येथील जिल्हा नियोजन … Read more

भेसळमुक्त, सकस आहाराला नागरिकांनी प्राधान्य द्यावे – राजेंद्र शिंगणे

औरंगाबाद – सुदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी सकस, चांगले, सर्व जीवनसत्वे असलेले आणि भेसळमुक्त अन्नाचे सेवन करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे अन्न नागरिकांना मिळावे यासाठी शासनस्तरावरून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  अन्न औषध प्रशासन विभागाकडून आस्थापनांची तपासणी, दोषींवर कारवाई करण्यात येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाकडून प्राधान्य देण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी  सांगितले. … Read more

अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झाला पाहिजे. जिल्ह्यातील गुटख्याचे एन्ट्री पॉईंट चिन्हीत करावेत. या पॉईंटवर पोलीसांनी नजर ठेवून कारवाई करावी. जिल्ह्यात गुटख्याची अवैध विक्री, वाहतूक होणार नाही, यासाठी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी … Read more

कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला दूर ठेवायचे असल्यास लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व … Read more

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम – राजेंद्र शिंगणे

मुंबई – दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेतली जात आहे. मात्र जनतेनेही  मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे … Read more

अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा – राजेंद्र शिंगणे

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष रहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न प्रशासनचे … Read more

राज्यातील कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यातीसाठी आवश्यक सहकार्य करणार – राजेंद्र शिंगणे

मुंबई – राज्यातील कृषी आणि खाद्य उत्पादन निर्यात वाढावी, यासाठी शासनामार्फत सहकार्य करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. इंडिया बिझनेस ग्रुप चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधी मंडळाने अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परिमल … Read more

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – जिल्हयात माहे 01 जून 2021 ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकुण 90 महसूल मंडळा पैकी 53 महसूल मंडळात (65 मि.मी पेक्षा जास्त पर्जन्यमान) अतिवृष्टी झाली. तसेच जिल्ह्यात या कालावधीत बऱ्याच भागात सततचा पाऊस पडत होता. त्यामुळे नदी, नाला व ओढे यांना पुरही आले. परिणामी, नदीकाठच्या शेतात पाणी साचून किंवा शेतातील पाण्याचे निचरा … Read more