प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा केंद्राचा हिस्सा लवकर द्यावा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे मागणी

मुंबई – राज्यात जुलै-2021 मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 900 कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह … Read more

दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ द्या – बच्चू कडू

अकोला – जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंद व त्याची सर्व अनुषंगिक माहिती संकलन करण्यासाठी दिव्यांग सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करा. सर्व्हेक्षणाव्दारे प्राप्त माहितीनुसार दिव्यांगांना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ प्राधान्याने द्या, असे निर्देश  पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले. दिव्यांगाकरीता असलेला पाच टक्के निधी खर्चाबाबत आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा … Read more

मराठवाड्यातील पहिली योजना, सीएनजीमार्फत घरोघरी मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

लातूर – लातूर शहरात लवकरच पाईपलाईनद्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगालाही चालना मिळणार असून लातूरच्या विकासाला आता यामुळे गती मिळेल. औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत स्थापन्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकांतर्गत औसा रोड येथे अशोका गॅस एजन्सीजच्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. … Read more

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांमध्ये राबविण्यास राज्य शासनाची मंजुरी

मुंबई – विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके, तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा एकूण २४४ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात येत होती. या योजनमध्ये राज्यातील उर्वरित सर्व १०६ तालुक्यांचा समावेश केला असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत  शेतकऱ्यांना ठिबक व … Read more

मोठा निर्णय: केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDAR) ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत  योजना आहे.  ही योजना 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. योजनेच्या 13 कोटी 70 लाख रुपये खर्चासही मंजुरी … Read more

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना (NAPDDAR) राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई – मादक पदार्थांचे सेवन व गैरवर्तन ही समस्या वाढत असून या समस्येच्या मुख्य कारणांमध्ये मुख्यतः मानसिक तणाव, जीवनशैलीतील बदल, सामाजिक व आर्थिक कारणे इत्यादी महत्त्वाची आहेत. त्यासाठी योजना तयार करुन त्यास प्रतिबंध घालणे ही काळाची गरज आहे. यासंबंधीच्या संवैधानिक तरतूदी लक्षात घेवून, नागरिकांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मद्यपान, दारु आणि … Read more

‘हनी मिशन’ योजनेतून स्वयंरोजगाराची संधी

अमरावती – जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधकेंद्रचालकांना मधुमक्षिकापालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून, ग्रामीण भागात पूरक रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. याचअंतर्गत दर्यापूर तालुक्यातील योगिता इंगळे या युवतीने ‘गॉर्जेस रॉ हनी’  या नावाने मधाचा ब्रँड विकसित केला असून, त्यातून त्यांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध झाला आहे. प्रगतीशील मधकेंद्रचालक म्हणून या युवतीची निवड करण्यात आली … Read more

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहित कालावधीत खर्च करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे – अब्दुल सत्तार

धुळे – कोरोना विषाणूचे संकट अद्याप संपुष्टात आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून होणाऱ्या विविध उपाययोजनांना गती देत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहीत कालावधीत विकास कामांवर खर्च होण्यासाठी आतापासून नियोजन करावे. लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री … Read more

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आराखड्यानुसार प्राप्त निधी सर्व यंत्रणांनी प्राधान्यक्रम ठरवून विहीत मुदतीत खर्च करावा – जयंत पाटील

सांगली – जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 चा आराखडा 404 कोटी 79 लाखाचा असून यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 320 कोटी, विशेष घटक कार्यक्रमासाठी 83 कोटी 81 लाख आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 98 लाख रूपये असा मंजूर नियतव्यय आहे. यापैकी माहे सप्टेंबर अखेर शासनाकडून प्राप्त तरतूद 170 कोटी 31 लाखाची असून यामधील 55 कोटी 33 … Read more

सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा – हसन मुश्रीफ

पुणे – राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी, जिल्हा … Read more