पूरस्थितीमुळे बाधित १४ जिल्ह्यांसाठी २८६० कोटीच्या मदतीनंतर ९ जिल्ह्यांसाठी ७७४ कोटी मदत – उद्धव ठाकरे

मुंबई – शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पूरस्थितीमुळे बाधित 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची मदत देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. २६ ऑक्टोबरच्या दिवशी 14 बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2860 कोटी रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली असून वाटपास सुरुवातही झाली आहे. कोणत्याही बिकट परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी तत्पर असून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधीची … Read more

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर

मुंबई – राज्यात मागील २ ते ३ महिन्यात म्हणजेच जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी येत आहे कि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना दोन हजार ८६० कोटी ८४ लाख रुपयांची वाढीव दराने मदत देण्यात येणार आहे. राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या … Read more

लसीकरणामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास मदत; जनजागृती व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरणाचा वेग वाढवावा – छगन भुजबळ

नाशिक – लसीकरणामुळे नागरिकांना चांगला फायदा होत असून त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी मदत होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात विविध मार्गाने जनजागृतीच्या माध्यमातून व लोक प्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना सद्यस्थिती आढावा … Read more

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात येणार – विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यानी दिली आहे. … Read more

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा – जिल्हयात माहे 01 जून 2021 ते 24 ऑक्टोबर 2021 या कालावधीत एकुण 90 महसूल मंडळा पैकी 53 महसूल मंडळात (65 मि.मी पेक्षा जास्त पर्जन्यमान) अतिवृष्टी झाली. तसेच जिल्ह्यात या कालावधीत बऱ्याच भागात सततचा पाऊस पडत होता. त्यामुळे नदी, नाला व ओढे यांना पुरही आले. परिणामी, नदीकाठच्या शेतात पाणी साचून किंवा शेतातील पाण्याचे निचरा … Read more

‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल – बाळासाहेब थोरात

अमरावती – कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख गमाविलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आर्थिक मदतीसह आपण एकटे नाहीत या भावनेमुळे धीर देणारा ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. महिला आर्थिक विकास महामंडळ, रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी, सह्याद्री फाऊंडेशन स्वयंसेवी संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हात … Read more

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आगोदरच मदत मिळणार – राजेश टोपे

मुंबई – राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून दहा हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर एनडीआरएफच्या नियमात जी मदत बसते ती मदत दिवाळीच्या आगोदरच देण्याची व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने केली आहे. नंतर झालेल्या नुकसानीची मदत जी मंत्रीमंडळाने अत्ताच मान्य केली ती दिवाळीनंतर मिळेल. असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. एकूण … Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात क्रीडा सुविधा निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत – सुनील केदार

नागपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर, विद्यार्थी यांच्यावर तणाव असतो. खेळामुळे त्यांच्यावरील तणाव कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे याठिकाणी अद्ययावत वैद्यकीय सुविधांसोबतच क्रीडा सुविधा निर्मितीसाठीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘जीएमसी’ स्पोर्टस् क्लबच्या नवीन क्रीडा संकुलामधील लॉन टेनिस व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन … Read more

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, लागल्यास कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करणार – अजित पवार

औरंगाबाद – मराठवाड्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदी ठिकाणी देखील शेतीचे प्रंचड नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची आमची भूमीका आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफ फंडातून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, लागल्यास कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. … Read more

बाधित शेतकऱ्यांना मदत करणार – सुभाष देसाई

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त  मदत करणार असल्याची ग्वाही उद्योग व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शेतकऱ्यांना दिली. गंगापूर  तालुक्यातील आसेगाव व वैजापूर तालुक्यातील सोनेवाडी येथील बाधित झालेल्या शेतपिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून श्री. … Read more