‘म्हाडा’ मार्फत 5 हजार 183 कुटुबांना मिळणार हक्काचे घर

पुणे – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (म्हाडा) (MHADA) विविध उत्पन्न गटाअंतर्गत सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील 5 हजार 183 पात्र कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ‘2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर’ उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याच ध्येयाच्या दिशेने पडलेलं एक … Read more

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत विभागातील 6 हजार 123 गावात नळाद्वारे पिण्याचे पाणी

नागपूर – ग्रामीण भागातील जनतेला बाराही महिने नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम विभागातील 6 हजार 123 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. दर दिवशी प्रती व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी देणाऱ्या या योजनेसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन मिशन मोडवर या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे … Read more

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश

काल मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओमायक्रॉनला रोखण्यासाठी निर्देश दिले आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्राने सध्या 12 कोटीं 3 लाख 18 हजार 240 डोसेस दिले असून 4 कोटी 37 … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आढळून आले आहे. तर देशात गेल्या २४ तासात  8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 98 हजार … Read more

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगारांना रोजगार – नवाब मलिक यांची माहिती

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये 26 हजार 93 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; तर ‘इतक्या’ कोरोना रूग्णांचा मृत्यू

दिली – गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  415 जणांचा मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार देशात  सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 99 हजार 974 झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. … Read more

महाआवास अभियानांतर्गत विभागात ९० हजार घरकुलांचे बांधकाम

नागपूर – विभागातील घरकुल नसलेल्या कुटुंबांना महाआवास अभियानांतर्गत  प्रधानमंत्री आवास  तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 90 हजार घरकुले उपलब्ध करुन देण्यात येत असून येत्या वर्षभरात घरकुलाच्या बांधकामाचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महा आवास अभियान-2 उपक्रमाचे नियोजन तसेच घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठीच्या विभागीय … Read more

रमाई आवास योजना : राज्यात ग्रामीण भागात १ लाख १३ हजार ५७१ व शहरी भागात २२ हजार ६७६ घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य शासनाची मंजुरी

मुंबई –  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती, सामाजिक न्याय व … Read more

जलसंवर्धन योजनेतून ७ हजारांहून अधिक प्रकल्पांची दुरुस्ती; १ हजार ३४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार

मुंबई – मृद व जलसंधारण विभागामार्फत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 7 हजार 916 जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी 1 हजार 341 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना अंतर्गत मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील 0 ते 100 हेक्टर, 101 ते 250 हेक्टर आणि 251 … Read more

देशात गेल्या २४ तासात 10 हजार 967 रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच घट पाहायला मिळाली आहे. तर देशात गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 318 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 465 जणांचा मृत्यू झालाय. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. तर देशात गेल्या २४ तासात तब्बल 10 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या … Read more