कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – राजेंद्र शिंगणे

बुलडाणा, (जिमाका) दि. 8 :  कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाला दूर ठेवायचे असल्यास लसीकरण करून घेणे हाच पर्याय आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पर्यंत पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व … Read more

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

मुंबई – कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या विविध उपाययोजनांसाठी ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित

मुंबई – कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्त कोकण,विभागीय आयुक्त  पुणे, विभागीय आयुक्त नागपूर, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना एकूण ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोविड – १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू … Read more

कोविडमुळे निधन झालेल्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – सुनील केदार

नागपूर – कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिला भगिनींच्या पाठीशी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे उभे आहेत. अशा आपदग्रस्तांचे नुकसान व वेदना दूर सारण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत त्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्राधान्याने लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी संबंधित … Read more

कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा – दत्तात्रय भरणे

सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावी, असे आवाहन  पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांनी केले. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर … Read more

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाविद्यालये सुरु करा – नितीन राऊत

नागपूर – जिल्ह्यातील महाविद्यालये सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार कृषि विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये सुरु करण्यात यावी. महाविद्यालये सुरु करताना दोन डोस घेतलेल्या प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यासह सूक्ष्म लक्षणे आढळणाऱ्या प्रत्येकाची ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी करुन प्रवेश देण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत … Read more

कोविड काळात ऑनलाईन शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर

मुंबई – कोविडच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे महाविद्यालय ऑनलाईन सुरू होती. शैक्षणिक संस्थानी अडचणीच्या काळात सुद्धा विद्यार्थी हित जोपासून ऑनलाईन शिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. ऑफलाईन महाविद्यालय सुरू होत असताना एकही विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. माटुंगा … Read more

कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – उद्धव ठाकरे

मुंबई – कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले . महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी … Read more

जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण मोहीम गतिमान करा – दादा भुसे

मुंबई – पालघर जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून उपाययोजना कराव्यात आणि लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी, अशा सूचना कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. कृषीमंत्री तथा पालकमंत्री श्री.भुसे यांनी  मंत्रालयात संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत करावयाच्या उपाययोजना, वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत  संबंधित यंत्रणांची आढावा बैठक … Read more

कोविड बिलांचे लेखापरीक्षण गतीने करण्यासाठी कार्यवाही करा – राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई – खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांना आकारलेल्या बिलांचे लेखापरीक्षण गतीने होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. कोरोना एकल पुनर्वसन समिती आणि जन आरोग्य अभियानाचे प्रतिनिधी यांनी विविध मुद्यांबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यानंतर श्री. टोपे यांनी या सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, … Read more