राज्यात चित्रपटाला लवकरच उद्योगाचा दर्जा – अमित देशमुख

पुणे – राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे राज्य शासनाच्या महासंस्कृती आणि पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. … Read more

‘या’ तारखेपासून मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार

मुंबई: मुंबई आणि पुणे पालिकेने (Municipal Corporation) शाळा सुरु करण्याविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सुरुवातीला १ डिसेंबर पासून शाळा सुरू करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता ओमायक्रॉनच्या (omicron) संसर्गामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण करत … Read more

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यात पुन्हा निर्बंध

पुणे : उद्यापासून सुरु होणाऱ्या  पुण्यातील चित्रपट आणि नाट्य गृहात प्रेक्षकांच्या संख्येवर निर्बंध नसतील अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच पुन्हा निर्बंध घालावे लागत आहेत. मायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चित्रपट आणि नाट्यगृहात सध्याच्या निर्बंधांनुसार 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार आहे. पुण्यातील खुल्या जागेतील कार्यक्रमांसाठी 25 … Read more

जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न – अजित पवार

मुंबई – “महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी. सर्व समाजघटकांना … Read more

कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक – अजित पवार

पुणे – जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि चित्रपटगृह तसेच नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षक क्षमतेलाही परवानगी देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा : बाजार समितीमध्ये लाल कांद्याला पहिल्याच दिवशी मिळाला तब्बल ‘इतका’ दर

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे.  आपल्याला कांदा हा रोजच्या आहारात लागतो. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर  कांद्याची लागवड केली जाते. तसेच महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत.  … Read more

सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल – दिलीप वळसे-पाटील

पुणे – सहकार क्षेत्रातील अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. राष्ट्रीय सहकार सप्ताह निमित्ताने मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या परिषदेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष … Read more

नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे – अब्दुल सत्तार

पुणे – जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वाचे योगदान असून आपल्या अधिकारांचा कार्यक्षम वापर करताना  नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करावे, असे आवाहन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे महसूल व वन विभागांतर्गत आयोजित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय महसूल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बैठकीस महसूल विभागाचे अपर … Read more

आरोग्य क्षेत्रातील संशोधनात सातत्य हवे – आदित्य ठाकरे

पुणे – कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण नवीन संशोधनाची गरज आपल्या लक्षात आली असून त्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील 3 टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन मंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार राज्यमंत्री तथा भारती … Read more

अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करा – राजेंद्र शिंगणे

पुणे – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन पाहता अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळीस प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष रहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न प्रशासनचे … Read more